Ganesh Chaturthi Bhajan in Marathi – भगवान गणेशाची भजन

Please follow and like us:

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi – गणेश हा संकटे दूर करणारा आणि शांती ,समृद्धी, संपत्ती आणि यश आणि आनंद देणारा मानला जात असल्याने, गणेशाच्या आगमनाणे लोकांच्या घरांमध्ये एक आशा उमेद निर्माण होते. हा सण आणखी अविस्मरणीय बनवण्यासाठी गणेशाची टॉप १० भजन आम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना साठी घेऊन आलो आहोत. भजनामुळे अंगी सद्‌भाव येतो व भक्तीचा रंग चढतो एखाद्या देवाची किंवा देवतेची स्तुती करण्यासाठी गायले जाणारे गाणे म्हणजे भजन.Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

प्रथम तुला वंदितो कृपाडा
प्रथम तुला वंदितो कृपाडा ,
गजानना गणराया…
विघ्न विनाशक गुणिजन पालक
दुरित तिमिर हारका
सुख कारक तू दुःख विदारक
तूच तुझा सारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
विनायका प्रभुराया

सिद्धि विनायक तूच अनंता
शिवात्म्जा मंगला
सिन्दुरवदना विध्याधिशा
गणाधिपा वत्सला
तूच ईश्वरा साह्य करावे
हा भव सिन्धु तरया

गज वदना तव रूप मनोहर
शुक्लाम्बर शिव सुता
चिंतामणि तू अष्टविनायक
सक्लांची देवता
रिद्धिसिद्धि चा वरा दयाडा
देई कृपे ची छाया

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

गणपति राया पड़ते मी पाया
गणपति राया पड़ते मी पाया
काय मागु मागन रे
तुझा दयेचा तुझा कृपेचा
आशिर्वाद राहु दे रे
हेच माझ सांगन रे देवा

नाही नवस साह्य केले
कधी यात्रे ला नाहीं गेले
तारी मनात मी पुजियेले
तुझ्या भक्ति ने आता सुखाने
भरले घर आंगन रे
हेच माझ सांगन रे देवा
हेच माझ सांगन रे देवा

मोह सुखाचा नहीं सोस
तुझा नामाचा लागे ढास
आता अंतरी उरली आस
माझ्या कपाडी अखंड राहों
सौभग्य चान्दन रे
हेच माझ सांगन रे देवा
हेच माझ सांगन रे देवा

आता मांगन मांगू कश्याला
माझा संसार सोन्याचा झाला
सुख लाभल माझ्या जीवाला
गुणी भरतार माझी लेकर
करजा हीच राखन
हेच माझ सांगन रे देवा
हेच माझ सांगन रे देवा

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

तूच सुखाचा हाय ठेवा
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे

तुझ्या नामात हाय गोडवा
तूच सुखाचा हाय ठेवा,
माझ्या गणपती देवा
तूच सुखाचा हाय ठेवा,
माझ्या गणपती देवा

ढोल ताशाच्या ठेक्या वरती,
भक्त झाले हो सारे धुंद
आली घराला मंगलमूर्त,
आज आनंदी हो आनंद
माझ्या देवांन माझ्या गणान,
पितांबर ल्याले नवा
तूच सुखाचा हाय ठेवा
माझ्या गणपती देवा

ते सुरवर मुनिवर गाती,
देवा अथांग तुझी ही कीर्ती
तू देवाचा देव गणपती,
करी मनोकामना पूर्ती
माझ्या गणाच माझ्या देवाच,
मंगलमय रूप पहावा
तूच सुखाचा हाय ठेवा,
माझ्या गणपती देवा

हिरे जडीत मुकुट डोई,
वाजे रुणझुण घुंगुरू पायी
संगे पुजली ती गौराई,
काय सांगू तिची नवलाई
महती लिहायला महती लिहायला,
त्या कैलासाला बोलवा
तूच सुखाचा हाय ठेवा,
माझ्या गणपती देवा

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

गजानना श्री गणराया
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

सिंदुरचर्चित धवळे अंग
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

गौरीतनया भालचंद्रा
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

तुझ मागतो मी आता मज ध्यावे एकदंता
तुझ मागतो मी आता
मज ध्यावे एकदंता

तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती

धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण

तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

आला रे आला गणपती आला
पार्वतीच्या बाळा,पायात वाळा
पार्वतीच्या बाळा,तुझ्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातलात माळा
ताशांचा आवाज
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला

मोदक लाडू संगतीला घेऊ
भक्ती भावाने देवाला वाहु
गणरायच गुण गान गाऊ
डोळे भरून देवाला पाहु
देवाला पाहु,देवाला पाहु
देवाला पाहु,देवाला पाहु
गाव हा सारा रंगून गेला
गणपती माझा नाचत आला
ताशाचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला

वंदन माझे,तुझिया पाया
धरी शिरावर,कृपेची छाया
भक्ताला या दर्शन दयाया
देवा आधी देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
लहान थोरा आनंद झाला
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे
गौरीचा गणेशा मी वंदितो तुला रे
दर्शन देऊन जाना रेे
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे

उभा रंक नेहमी तुला हाक मारतो
चौसठ कला विध्या तुला भिक मागतो
आज साथ देई मला रे
रिद्धि सिद्धि घेऊंन येना रे

तूच तिन्ही लोकाच्या राजा बनविला
संत ऋषी मुनी प्रथम पुजीले  तुला
बुद्धी देयी आज मला रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे

लाडू आणि मोदक मी देई रे तुला
आज भर सभे मध्ये भजतो तुला
भक्तां वरी कृपा करी रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे

गौरी चा गणेशा मी वंदितो तुला रे
दर्शन देऊन जा ना रे
रिद्धी सिद्धी घेऊन येणा रे

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि
गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ।
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥

गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने ।
गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे ।
गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिने ।
गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे ।
गुरुदैत्यगलच्छेत्रे गुरुधर्मसदाराध्याय ।
गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय ।
गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि ।
गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि ।
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥

ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने ।
गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे ।
गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते ।
गायकाधीनविग्रहाय गङ्गाजलप्रणयवते ।
गौरीस्तनन्धयाय गौरीहृदयनन्दनाय ।
गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय ।
गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि ।
गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि ।
गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा

संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
फुलफुलातून देतो संदेश तु आम्हाला देवा
जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा
माणुसकीचा मंत्र दिला ,प्रेमाचा पावन कंठ दिला तू
दिला आम्हाला तू ,फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा

जन्म लाभला आलो ,जगी दिला फुलांचा झुला
मार्गी मोक्षाच्या जरी निघालो ,जात तुझी रे फुला
या मातीला आकार दिला शिल्पकार तू खरा
तुझा मुखी हे शब्द गवसले गीतकारतु खरा
ऋणी तुझे आम्ही ,फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा

मन सुंदर सुंदर जसा मोगरा ,सदाफुलीचा साज नाचरा
ही जाईजुई वारयांशी डोले रातराणी तरयांशी बोले
शेवंतीने स्वप्न सजवुया झेंडू संगे भक्तीत रमुया
हे कमळा सम निस्वार्थ बनुया गुलाब क्षीचे पार्थ बनुया
परिजातची संधी जाते  सोनचफा बोली नाचे
या भूमीवर देवांचा तारा ,अभिमानाने अवतरला
सर्वधर्माचा तुच लाडका भेदभाव ना तुला
हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा धन्य धन्य देवा

संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
फुलफुलातून देतो संदेश तु आम्हाला देवा
जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा
माणुसकीचा मंत्र दिला ,प्रेमाचा पावन कंठ दिला तू
दिला आम्हाला तू ,फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

गणराज रंगि नाचतो नाचतो
गणराज रंगि नाचतो नाचतो
पायि घागर्‍या करिती रुणझुण
नाद स्वर्गि पोचतो !

कटि पीतांबर कसुन भर्जरी
बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो !

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रह्मा धरितो तालहि रंगुन
मृदंग धिमि वाजतो !

देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो !

Ganesh Chaturthi Bhajan in Marathi

Must Read:Happy Ganesh Chaturthi 2022 Wishes in Hindi
Must Read:Happy Ganesh Chaturthi 2022 Images Download
Must Read:Happy Ganesh Chaturthi 2022 Wishes in Telugu
Must Read:Ganesh Chaturthi Captions
Must Read:Happy Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Must Read:Happy Ganesh Chaturthi Wishes in Tamil
Must Read:Happy Ganesh Chaturthi Wishes in English
Must Read:Happy Ganesh Chaturthi 2022 Status Video Download
Must Read:Ganesh Chaturthi Puja Samagri List in Hindi

tentaran google news

For more articles like, “Happy Ganesh Chaturthi 2022 Images Download”, do follow us on FacebookTwitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.

Leave a Reply

Your email address will not be published.

The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with their respective owners. We make every effort to link back to original content whenever possible. If you own rights to any of the images, and do not wish them to appear here, please contact us and they will be promptly removed. Usage of content and images on this website is intended to promote our works and no endorsement of the artist shall be implied. Read more detailed ​​disclaimer
Copyright © 2022 Tentaran.com. All rights reserved.
× How can I help you?