Narasimha Jayanti Wishes in Marathi – भगवान नृसिंह जयंतीच्या मराठीत शुभेच्छा
Narasimha Jayanti Wishes in Marathi – धार्मिक कथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद याला राक्षस राजा हिरण्यकशिपूपासून वाचवण्यासाठी अर्धा नर आणि अर्धा सिंहाच्या रूपात नृसिंह अवतार घेतला होता. त्यामुळे तेव्हापासून हा दिवस भगवान नृसिंहाची जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान नृसिंहाला शक्ती आणि पराक्रमाची देवता मानले जाते. भगवान नृसिंह हे श्री हरी विष्णूचे उग्र आणि शक्तिशाली अवतार असल्याचे म्हटले जाते. त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण होते. धार्मिक ग्रंथांनुसार, या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने भगवान नरसिंहाची श्रद्धेने आणि भक्तीभावाने पूजा केली तर त्याला सर्व जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख–समृद्धी प्राप्त होते.
Narasimha Jayanti Wishes in Marathi – भगवान नृसिंह जयंतीच्या मराठीत शुभेच्छा
According to religious legends, on this day Lord Vishnu incarnated as Narsimha in the form of half male and half lion to save his devotee Pralhad from the demon king Hiranyakashipu. Therefore, since then, this day is celebrated with great enthusiasm as the birth anniversary of Lord Narsimha. Lord Narsimha is considered to be the deity of power and might. Lord Narsimha is said to be the fierce and powerful incarnation of Sri Hari Vishnu. Worshiping him protects devotees from all kinds of troubles. According to religious scriptures, if a person worships Lord Narasimha on this day with faith and devotion, he is freed from all birth sins and attains happiness and prosperity in life.
Narasimha Jayanti Wishes in Marathi
“दिवस वैशाख शुद्ध चतुर्दशीचा
श्रीविष्णूंचे अवतार भगवान नृसिंह जयंतीचा”
सर्वाना हार्दिक शुभेच्छा
भगवान नृसिंह स्मरणाने आपल्यालाही बळ मिळावे
या हेतूने पूजन करावे शक्ती आणि परक्रमाची देवतेच्या
नृसिंह जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
“साद ऐकुन भक्ताची
शेवटी श्रीविष्णु खांंबातुन प्रकट झाले
नृसिंह अवताराने हिरण्यकश्यपु याला मांडीवर घेऊन
त्याचे पोट फाडले” या दिनाच्या निमित्त साजऱ्या होणाऱ्या
नृसिंह जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Narasimha Jayanti Messages in Marathi
श्रीविष्णूंचे अवतार भगवान नृसिंह जयंतीच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
वडील हिरण्यकश्यपू हा राक्षस असतानाही
विष्णूचा मोठा भक्त पुत्र प्रल्हाद व्हावा
भक्तीने भगवान नरसिंहाने ही अवतार घ्यावा
नृसिंह जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
भगवान नरसिंहाची श्रद्धेने आणि भक्तीभावाने पूजा करा
सर्व जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळवा
जीवनात सुख–समृद्धी प्राप्त करा.
नृसिंह जयंतीच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
Narasimha Jayanti Quotes in Marathi
भक्तास वाचवण्यासाठी
अर्धा नर आणि अर्धा सिंहाच्या रूपात
ज्यांनी नरसिंह अवतार घेतला होता
आश्या भगवान नरसिंह
जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
शक्ती व पराक्रमाची देवता
श्री नरसिंह भगवान
यांच्या जयंती निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
श्री नरसिंह भगवानता हेच मागणे
सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण दे
जीवनात सुख समाधान मिळू दे
भगवान नरसिंह जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
Narasimha Jayanti SMS in Marathi
दैत्यराज हिरण्यकश्यपू च्या अत्याचारा पासून
भक्ताची रक्षा करणारे भगवान नरसिंह जयंतीच्या
सर्वाना हार्दिक शुभेच्छा ”
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ।।
भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे !
उपवासं करिष्यामि सर्वभोग विवर्जिता:!!
नृसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Narasimha Jayanti Greetings in Marathi
श्रीहरी विष्णूचे चौथे अवतार
शक्तीची देवता, दृष्टाचें मारक
भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
हत्तीच्या पायदळी तुळवले ,
उकळत्या तेलात टाकले ,
कड्यावरुन फेकुन दिले ,
तरीही प्रल्हादाने भक्तीने विश्व् जिकंले
भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
टीप : Tips
नरसिंह अवतार विषयी एक आख्यायीका आपण जाणून असाल, वडील हिरण्यकश्यपू हा राक्षस असतानाही त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा मोठा भक्त होता. मात्र हिरण्यकश्यपूला हे मान्य नव्हते. म्हणुनच त्याने प्रल्हादाचा छळ करायला सुरुवात केली, हत्तीच्या पायदळी देणे, उकळत्या तेलात टाकणे,कड्यावरुन फेकुन देणे असे क्रुर प्रकार त्याने केले,तरीही प्रल्हादाच्या मनातील विष्णु भक्ती कमी झाली नाही.
या भक्ताची साद ऐकुन शेवटी श्रीविष्णु यांंनी खांंबातुन प्रकट होट नृसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपु याला आपल्या मांडीवर घेउन त्याचे पोट फाडुन वध केला. या दिनाच्या निमित्त साजऱ्या होणाऱ्या नृसिंह जयंतीच्या तुम्हा वाचकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा!
Must Read:Narasimha Jayanti puja vidhi
Must Read:The Legend behind Vishnu’s Narasimha Avatar
Must Read:kaise hua narsimha ka krodh shant
For more articles like, “Narasimha Jayanti Wishes in Marathi – भगवान नृसिंह जयंतीच्या मराठीत शुभेच्छा,do follow us on Facebook, Twitter, and Instagram. For watching our collection of videos, follow us on YouTube.